

गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धु धु धुतलं आणि आपलं शतक पूर्ण केले. त्याचं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलं शतक आहे.

ऋतुराज गायकवाडने मॅक्सवेलच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला.

ऋतुराज गायकवाड 57 चेंडूत 123 धावा करून नाबाद राहिला. गायकवाडने या खेळीत 13 चौकार आणि 7 षटकार मारले. 134.8 च्या स्ट्राइक रेटने त्याने फलंदाजी केली.

शतकी खेळीपूर्वी ऋतुराज गायकवाडने टी-20 मध्ये 3 अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ऋतुराज गायकवाडचा संघात सहभाग करण्यात आला आहे. ऋतुराजने शतकी खेळीने आपल्यातील क्षमता दाखवून दिलं आहे.