
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होत आहे. या मालिकेचा थरार 19 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीचं कमबॅक होणार आहे. एकदिवसीय मालिकेत रोहित आणि विराट यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाकडून वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम हा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. तर विराट आणि रोहित या दोघांनाही सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे सचिनची या विक्रमबाबत दोघांपैकी आधी कोण बरोबरी करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागून आहेत. (Photo Credit : PTI)

सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय कारकीर्दीत 9 शतकं झळकावली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक 9 एकदिवसीय शतकं करण्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर रोहित आणि विराट या दोघांनी कांगारुंविरुद्ध 8 वेळा शतक केलं आहे. (Photo Credit : PTI)

विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या एकूण 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये 54.46 च्या सरासरीने 2 हजार 451 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 8 शतकं आणि 15 अर्धशतकं झळकावली आहे. विराटने 8 पैकी 5 शतकं ही ऑस्ट्रेलियातच झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

तसेच रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 46 सामन्यांमध्ये 57.30 च्या सरासरीने 2 हजार 407 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 8 शतकं आणि 9 अर्धशतकं केली आहेत. रोहितनेही विराटप्रमाणे ऑस्ट्रेलियात 5 शतकं केली आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी सचिनच्या विक्रमाची कोण बरोबरी करणार? याकडे लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)