IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू उर्वरित टी20 सामन्यात खेळणार नाहीत, कारण…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू पुढच्या सामन्यात खेळणार नाहीत.

| Updated on: Nov 04, 2025 | 9:52 PM
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना 6 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात तीन बदल करण्यात आले आहे. तीन स्टार खेळाडूंना आराम दिला गेला आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर ट्रेव्हिस हेड चौथ्या आणि पाचव्या टी20 सामन्यात खेळणार नाही. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी डावलण्यात आलं आहे. आता काही दिवस ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये कसोटी खेळणार आहे. (Photo- PTI)

3 / 5
शॉन अबॉटलाही टी20 संघातून वगळण्यात आलं आहे. अबॉटची इंग्लंडविरुद्धच्या एशेज मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या शॉन अबॉटची निवड होऊ शकते. त्यालाही कसोटीची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे. (Photo- TV9 Kannada वरून)

4 / 5
भारताविरूद्धच्या पहिल्या तीन टी20 सामन्यात एडम झम्पा खेळला होता. मात्र आता उर्वरित दोन सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी संघात तन्वीर सांघाची निवड केली आहे.(Photo- PTI)

5 / 5
ऑस्ट्रेलियाचा टी20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एडम झम्पा, माहली बियर्डमन, बेन द्वारशुइस. (Photo- PTI)