
भारताने पाकिस्तानवर आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताने विजयासाठी मिळालेलं 172 धावांचं आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ओपनर अभिषेक शर्मा हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने 39 बॉलमध्ये 74 धावा केल्या. (Photo Credit : Bcci X Account)

अभिषेकने 74 धावांच्या खेळीत 6 फोर आणि 5 सिक्स झळकावले. अभिषेकने 189.74 च्या स्ट्राईक रेटने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. (Photo Credit : Bcci X Account)

अभिषेकने या खेळीदरम्यान 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने यासह आपला गुरु आणि टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci X Account)

अभिषेक शर्मा टी 20I क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध वेगवान अर्धशतक करणारा पहिला भारतीय ठरला. अभिषेकने युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केला. अभिषेकने 2012 साली पाकिस्तान विरुद्ध 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. (Photo Credit : @OfficialAbhi04 X Account)

तसेच अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये 13 वर्षांनंतर अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकआधी विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक केलं होतं. (Photo Credit : @OfficialAbhi04 X Account)