
तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने एकदाची नाणेफेक जिंकली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला फलंदाजीला यावं लागलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिने 47.5 षटकात 10 गडी गमवून 270 धावा केल्या आणि विजयासाठी 271 धावांचं योगदान दिलं. यात क्विंटन डीकॉकची खेळी महत्त्वाची ठरली. (फोटो- Proteas Men X)

क्विंटन डी कॉकने नुकतीच आंतरराष्ट्रीयमध्ये घेतलेली निवृत्ती मागे घेतली. यानंतर पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं. त्यानंतर आता क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध शतकी खेळी केली आहे. क्विंटन डी कॉकने 80 चेंडूत शतक पूर्ण केलं. तर 89 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकार मारत 106 करून बाद झाला. (फोटो- Proteas Men X)

क्विंटन डीकॉकने आक्रमक फलंदाजी केली. वनडे क्रिकेटमधील त्याचे 23 वे शतक झळकावले. क्विंटन डी कॉकने फक्त 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर आणखी आक्रमक झाला. पुढील 50 धावा करण्यासाठी त्याने फक्त 38 चेंडू घेतले. यासह त्याने सौरव गांगुलीसह तीन दिग्गजांना मागे टाकले. (फोटो- Proteas Men X)

23 व्या शतकासह सर्वाधिक वनडे शतकांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशाखापट्टणममध्ये शतक झळकावून डी कॉकने सौरव गांगुली, डेव्हिड वॉर्नर आणि तिलकरत्ने दिलशान सारख्या दिग्गजांना मागे टाकले. या तिघांच्या नावावर 22 शतके आहेत. (फोटो- Proteas Men X)

डी कॉकने 1413 दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. यापूर्वी 23 जानेवारी 2022 रोजी शतक ठोकले होते. डी कॉकचे भारताविरुद्धचे हे सातवे शतक आहे. यासह त्याने दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. डी व्हिलियर्सच्या नावावर सहा शतकं आहेत. (फोटो- Proteas Men X)