IND vs SA: कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव, 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्यात सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताचा आपल्याच देशात हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे.

| Updated on: Nov 16, 2025 | 4:16 PM
1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला दणका दिला आहे. भारताची तयारी अर्धवट असल्याचं दिसून आलं. कोलकाता कसोटी सामन्यात भारताला खरं तर विजयाची संधी होती. पण संघात तालमेलच दिसला नाही. मोजके खेळाडू वगळता सर्व काही रामभरोसे होते. त्यामुळे भारतीय संघाला देशातच लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.   (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कमी धावसंख्येचा सामना होता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही संघांना 200 च्या पार धावा करता आल्या नाही. दोन्ही डावात गोलंदाजांचा वरचष्मा रााहिला.  भारताला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय संघ फक्त 93 धावा करू शकला.   (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 159 धावा केल्या. तर भारताने पहिल्या डावात 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान मिळालं. पण हे आव्हानही भारताला गाठता आलं नाही.   (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
टीम इंडिया पहिल्यांदाच इतक्या कमी धावांचा पाठलाग करताना पराभूत झाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 147 धावा गाठू शकला नव्हता. म्हणजेच 92 वर्षाच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा आणि लाजिरवाणा पराभव आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
2024 मध्ये मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने  भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा भारतीय संघ 147 धावांचा पाठलाग करताना 121 धावांवर सर्वबाद झाली होती. या दोन सामन्यांशिवाय भारतीय संघाने आपल्या देशात 200 पेक्षा कमी धावांचं टार्गेट गाठताना कधीच पराभवाचं तोंड पाहीलं नव्हतं.  (PHOTO CREDIT- PTI)