
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विक्रमाची संधी आहे. (फोटो- Pankaj Nangia/Getty Images)

विराट कोहलीने द्विपक्षीय वनडे मालिकेतील 196 डावात 9936 धावा केल्या आहेत. कोहलीने पहिल्या सामन्यात 64 धावा करताच द्विपक्षीय वनडे मालिकेत 10 हजार धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. (फोटो- PTI)

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीचा वनडे रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 65.39 च्या सरासरीने 1504 धावा केल्या आहेत. यात पाच शतकांचा समावेश आहे. (फोटो- Getty Images)

विराट कोहलीने रांचीच्या मैदानात पाच सामने खेळले आहेत. या सामन्यातील पाच डावात त्याने 192 च्या सरासरीने 384 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. (फोटो- PTI)

विराट कोहली नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत खेळला होता. पण पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने नाबाद 74 धावांची खेळी केली होती. (फोटो- PTI)