
आयपीएल 2025 स्पर्धा संपल्यानंतर शुबमन गिलच्या नशिबाचं टाळं खुलं झालं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीला रामराम ठोकला आणि कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आली. त्याच्या नेतृत्वात दोन मालिका यशस्वीरित्या पार पडल्या. आता दक्षिण अफ्रिकेचं आव्हान आहे. (Photo- BCCI Twitter)

कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर शुबमन गिलने कसोटीत धावांचा डोंगर रचला. शुबमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये 2025 वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आठ कसोटी सामन्यात 979 धावा केल्या. (Photo- BCCI Twitter)

कर्णधार शुबमन गिलने या वर्षात पाच शतकं आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. त्याने 69.92 च्या सरासरीने आणि 63.57 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. शुबमन गिलला कसोटीत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 21 धावांची गरज आहे. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिल कसोटी क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच एका वर्षात एक हजार कसोटी धावा करणार आहे. त्यामुळे शुबमन गिलसाठी 2025 हे वर्ष चांगलं गेलं असंच म्हणावं लागेल. इतकंच काय तर टी20 क्रिकेटमध्येही त्याने पुनरागमन केलं आहे. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिलने 2020 च्या शेवटी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत एखाद दुसरा कसोटी सामना सोडला तर सर्वच सामन्यात खेळला आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कसा खेळतो याकडे लक्ष लागून आहे. (Photo- BCCI Twitter)