
टीम इंडिया गुवाहाटीत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडिया आधीच या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला व्हाईटवॉश टाळायचा असेल तर 25 वर्षांत जे जमलं नाही ते करावं लागणार आहे. टीम इंडियाला गेल्या 25 वर्षांत एकदाही चौथ्या डावात 100 ओव्हर खेळता आलेलं नाही. (Photo Credit : PTI)

गुवाहाटीत भारताचं जिंकणं अवघड आहे. तसेच सामना अनिर्णित राखायचा असेल तर संपूर्ण पाचवा दिवस खेळू काढावा लागेल. भारताला त्यासाठी गेल्या 25 वर्षांत जे जमलं नाही ते करुन दाखवावं लागेल. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 25 वर्षांत चौथ्या डावात 100 ओव्हर खेळता आलेलं नाही. मात्र आता सामना प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे मायदेशात व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोणत्याही स्थितीत भारताला 100 षटकांचा सामना करावा लागेल. (Photo Credit : PTI)

भारताने मायदेशात अखेरीस 2008 साली चौथ्या डावात सर्वाधिक षटकं खेळली होती. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 98.3 ओव्हर खेळली होती. (Photo Credit : PTI)

तसेच गेल्या 25 वर्षात एकूण पाहता भारताने 2021 साली सिडनीत 131 षटकं खेळली होती. मात्र गुवाहाटीतील खेळपट्टी आणि भारतीय फलंदाजांची कामगिरी पाहता हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता फार कमी आहे. (Photo Credit : PTI)