
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात विराट कोहली फलंदाजीला आला तेव्हाच विक्रम नोंदवणार हे स्पष्ट होतं. विराट कोहलीने 32 चेंडूंचा सामना करत 24 धावा केल्या. यात त्याने 2 चौकार मारले. तसेच एका विक्रमाची नोंद केली.

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध एक धाव घेताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. द्विपक्षीय सामन्यात 21 हजार धावांचा पल्ला गाठला. यासह त्याने विक्रमांच्या यादीत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

द्विपक्षीय सामन्यात 21 हजार धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 24 धावा करत श्रीलंकेविरुद्ध 21023 धावा केल्या आहेत.

विराट कोहली याच्या आधी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने सर्वात जास्त धावा केल्या असून या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

सचिन तेंडुलकरने द्विपक्षीय सामन्यात 22960 धावा केल्या आहेत. तर कोहलीच्या नावावर आता 21023 धावा आहेत. जॅक कॅलिस 20655 धावांसह तिसऱ्या, कुमार संगकारा 20154 धावांसह चौथ्या आणि रिकी पाँटिंग 19268 धावंसह पाचव्या स्थानी आहे.