एकाच दिवशी तीन भारतीय फलंदाजांनी शतके झळकावली, चौथ्यांदा घडलं असं काही…

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने 286 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. यासह एका विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Oct 03, 2025 | 8:51 PM
1 / 5
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 162 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर पहिल्या डावात भारताने पाच गडी गमवून 448 धावा केल्या. तसेच 286 धावांची मजबूत आघाडी घेतली.  यात तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. टीम इंडियाने आधीच अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. (Photo_ BCCI Twitter)

2 / 5
एकाच डावात एकाच संघातील तीन फलंदाजांनी शतके झळकावल्याचा हा दुर्मिळ विक्रम आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात असं फक्त तीन वेळा घडलं आहे. एका वर्षात एकाच डावत तीन किंवा त्याहून अधिक फलंदाजांनी शतकी खेळी आहे. यापूर्वी 1979, 1986 आणि 2007 साली घडलं होतं. आता चौथ्यांदा असं घडलं आहे. (Photo_ BCCI Twitter)

3 / 5
सलामीवीर केएल राहुलने दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु झाल्यानंतर काही तासातच त्याचे 11 वे कसोटी शतक झळकावले. केएल राहुलने त्याच्या डावात 197 चेंडूंचा सामना केला आणि 12 चौकारांसह 100 धावा केल्या. (Photo_ BCCI Twitter)

4 / 5
यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची बॅटही दुसऱ्या दिवशी तळपली.  खेळाच्या तिसऱ्या सत्रात त्याने त्याचं पहिले कसोटी शतक पूर्ण केले. जुरेलने त्याच्या डावात 210 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकार, 3 षटकारांसह 125 धावा केल्या. (Photo_ BCCI Twitter)

5 / 5
उपकर्णधार रवींद्र जडेजानेही कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले.  ध्रुव जुरेलसोबत पाचव्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारीही केली.  दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी नाबाद राहिलेल्या जडेजाने 176 चेंडूत 104 धावा केल्या आहेत. यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. (Photo_ BCCI Twitter)