
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होत आहे. हा सामना ऐतिहासिक ठरण्याची दाट शक्यता आहे. चाहत्यांना अपेक्षित असं झाल्यास जवळपास 5 हजार दिवसांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यादाच होईल. (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे. जडेजाच्या बॅटमधून या सामन्यात निघणारी दहावी धाव ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी ठरणार आहे. (Photo Credit: PTI)

रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 300 विकेट्स आणि 4 हजार धावा करणारा चौथा ऑलराउंडर होण्यासाठी सज्ज आहे. जडेजा अशी कामगिरी करण्यापासून फक्त 10 धावा दूर आहे. (Photo Credit: PTI)

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकूण तिघांनीच 300 विकेट्स आणि 4 हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. या तिघांमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. कपिल देव, इयान बॉथम आणि डॅनियल व्हीटोरी या तिघांनी ऐतिहासिक कारनामा केला आहे. व्हीटोरी अशी कामगिरी करणारा तिसरा आणि शेवटचा खेळाडू आहे. व्हीटोरीने 16 जानेवारी 2012 रोजी झिंबाब्वे विरुद्ध 300 विकेट्स आणि 4 हजार धावा हा टप्पा पूर्ण केला होता. आता जडेजाकडे या खास क्लबमध्ये पोहचण्याची संधी आहे. (Photo Credit: PTI)

जडेजाने विंडीज विरूद्धच्या पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यामुळे आता जडेजा दिल्ली कसोटीत केव्हा 10वी धाव पूर्ण करुन या खास कल्बमध्ये स्थान मिळवतो, याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे. जडेजाने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत एकूण 334 विकेट्स घेण्यासह 3 हजार 990 धावा केल्या आहेत. (Photo Credit: PTI)