
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. एका दिवसात तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. केएल राहुलच्या शतकाने सुरुवात झाली आणि दिवस संपेपर्यंत रवींद्र जडेजानेही शतक ठोकलं. त्यामुळे भारत मजबूत स्थितीत असून 286 धावांची आघाडी आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

केएल राहुलसाठी 2025 हे वर्ष खूपच चांगलं गेलं असं म्हणावं लागे. इंग्लंड दौऱ्यातही त्याने चांगली फलंदाजी केली होती. आता वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर शतक ठोकत फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. केएल राहुलने 197 चेंडूत 12 चौकार मारत 100 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

केएल राहुलने शतक ठोकलं पण नको त्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. शतकी खेळीनंतरही नकोसा विक्रम कसा झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तसं झालं आहे. कारण या वर्षात केएल राहुलने तीन शतकं ठोकली. यापैकी दोन शतकं इंग्लंडविरुद्ध होती. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

केएल राहुल या वर्षात दोन वेळा 100 धावा करूनच बाद झाला. म्हणजेच कट टू कट 100 धावांवर विकेट टाकली. लॉर्ड्सवर शतक ठोकल्यानंतर तसंच घडलं. त्यानंतर आता अहमदाबाद कसोटीत घडलं आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

कसोटीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा 100 धावांवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. इंग्लंडचा लियोनार्ड ह्यूटन 4 वेळा, ऑस्ट्रेलियाचा ग्रॅमी वूड 3 वेळा, केएल राहुल 2 वेळा, वेस्ट इंडिजचा गॉर्डन ग्रीनीज 2 वेळा, केविन पीटरसन 2 वेळा, स्टी वॉ आणि मार्क वॉ 2 वेळा बाद झालेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)