
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स टी20 स्पर्धेसाठी इंडिया चॅम्पियन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय चॅम्पियन्स संघाचे नेतृत्व टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग करेल.

या संघात सुरेश रैना, शिखर धवन, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि इतर अनेक अनुभवी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा आणि विनय कुमार हे देखील इंडिया चॅम्पियन्स संघात आहेत.

2024 मध्ये झालेल्या पहिल्या WCL स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आता, इंडिया चॅम्पियन्सना पुन्हा 5 संघांना हरवून 2025 मध्ये चॅम्पियन बनण्याचा विश्वास आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स टी20 स्पर्धेचा दुसरा हंगाम18 जुलैपासून सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या सहा संघांमधील या टी20 स्पर्धेचा अंतिम सामना 2ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर होणार आहे.

भारत चॅम्पियन्स संघ : युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, सौरभ तिवारी, इरफान पठाण, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, गुरकृत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय सिंग, पवन कुमार, विनय कुमार. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्कवरून)