IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम, काय ते जाणून घ्या
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना भारताने तिसऱ्या दिवशीच खिशात घातला. अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं आणि विजय मिळवला. यासह अनेक विक्रम आपल्या नावावर केल्या आहेत.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना तिसऱ्या दिवस संपण्याआधीच संपला. भारताने हा सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 8 गडी गमवून 564 धावा केल्या आणि डाव घोषित केला. (Photo: BCCI)

भारताने ठेवलेल्या 564 धावांचा पाठलाग करणं काही अफगाणिस्तानला जमलं नाही. पहिला डाव 152 धावांवर आटोपला. 412 धावा असल्याने फॉलोऑन दिला गेला. या धावांचा पाठलाग करताना 112 धावा करता आल्या. भारताने हा सामना एक डाव आणि 300 धावांनी जिंकला. (Photo: BCCI)

भारताविरुद्ध अफगाणिस्तानची कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने 103 आणि 109 धावांवर सर्वबाद केलं होतं. आता दुसऱ्या डावात 112 धावांवर बाद केलं. बांगलादेशने 2023 मध्ये 115 आणि वेस्ट इंडियन 2019 मध्ये 120 धावांवर सर्वबाद केलं होतं. (Photo: BCCI)

भारताने अफगाणिस्तानचा केलेला हा सर्वात मोठा पराभव आहे. अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. यापूर्वी भारतानेच अफगाणिस्तानला 2018 मध्ये एक डाव 262 धावांनी पराभूत केलं. तर झिम्बाब्वेने बांगलादेशला एक डाव 73 धावांनी पराभूत केलं आहे. (Photo: BCCI)

टीम इंडियाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी नमवलं. 2018 मध्ये वेस्ट इंडिजला राजकोटमध्ये एक डाव आणि 272, 2018 मध्ये अफगाणिस्तानला बंगळुरूत एक डाव आणि 262 धावा, 2007 मध्ये बांगलादेशला मिरपूरमध्ये एक डाव आणि 239 धावा आणि 2017 मध्ये श्रीलंकेला नागपूरमध्ये एक डाव आणि 239 धावांनी नमवलं होतं. (Photo: BCCI)

आशियाई संघाने मिळवलेले दुसरा सर्वात मोठा विजय आहे. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तानने 2002 मध्ये लाहोरमध्ये न्यूझीलंडला एक डाव आणि 324 धावांनी नमवलं होतं. आता भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं आहे. (Photo: BCCI)

भारतीय भूमीवर यापेक्षा मोठा विजय 1958 मध्ये नोंदवला गेला होता. तेव्हा ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 614 धावा करून डाव घोषित केला होता. त्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच 124 आणि दुसऱ्या डावात 154 धावांवर सर्वबाद झाला होता. हा सामना भारताने एक डाव आणि 336 धावांनी गमावला होता. (Photo: BCCI)