Asia Cup 2025 : भारताने पहिल्या मिनिटात आलेला दबाव झुगारून मलेशियावर केली मात, 4-1 ने नमवलं

भारताने गेल्या काही वर्षात हॉकी पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतही पदक मिळवलं. आता आशिया कप स्पर्धेतही भारताची आक्रमक बाजू दिसत आहे. सुपर 4 फेरीत भारताने मलेशियाला 4-1 नमवलं.

Updated on: Sep 04, 2025 | 9:51 PM
1 / 5
आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात विजय मिळवल्यानंतर सुपर 4 फेरीतही तशी कामगिरी सुरु केली आहे. सुपर 4 मधील पहिला सामना कोरियाशी झाला. पण यात 2-2 अशी बरोबरी साधली. पण दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा धुव्वा उडवला.

2 / 5
खरं तर मलेशियाची या सामन्यात पहिल्याच मिनिटात बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे भारतीय संघ दडपणात होता. पहिल्या मिनिटातच मलेशियाने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटत होतं.

3 / 5
पहिल्या गोलची बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला 17 मिनिटं झुंज द्यावी लागली. पण भारताने आक्रमक बाणा काही सोडला नाही. 17 व्या मिनिटाला मनप्रीत सिंहने गोल मारला आणि सामना बरोबरीत आणला.

4 / 5
भारताने 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर मलेशियाला कंबरडं मोडलं. पुढच्या 7 मिनिटात धडाधड दोन गोल मारले. त्यामुळे सामना मलेशियाच्या हातून निसटला. 19 व्या मिनिटाला सुखजीत सिंह, 24 व्या मिनिटाला शिलानंद लाकडा याने गोल मारला. त्यामुळे मलेशियाचा कमबॅकच्या आशा जवळपास मावळल्या होत्या.

5 / 5
दुसऱ्या सत्रातील 38 व्या मिनिटात अनुभवी विवेक सागर प्रसादने चौथा गोल मारला. त्यामुळे हा सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला. त्यानंतर एकही गोल झाला नाही. हा सामना भारताने 4-1 ने जिंकला. खरं तर पहिल्या मिनिटाला मलेशियाने केलेल्या गोलनंतर असं कमबॅक करणं कठीण असतं. पण भारतीय संघाने ते करून दाखवलं. (सर्व फोटो- Hockey India Twitter)