
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवले. या विजयांसह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. यासह टीम इंडियाने पाकिस्तान संघाच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC)

टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची बरोबरी करून नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. (Photo- ACC)

2016 ते 2018 दरम्यान पाकिस्तानने 11 टी20 मालिका जिंकल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम झाला. आता टीम इंडियाने या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC)

भारताने शेवटची टी20 मालिका 2023 मध्ये गमावली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका पराभवानंतर टीम इंडियाने विजयी घोडदौड सुरू केली. तसेच सलग टी20 मालिका जिंकत आहे. ही विक्रमी मालिका आता न्यूझीलंडविरुद्धही सुरूच आहे. (Photo- ACC)

टीम इंडियाने सलग 11 टी20 मालिका जिंकल्या आहेत. यात पाकिस्तान संघाच्या विश्वविक्रमाची बरोबरी झाली आहे. जर टीम इंडियाने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी टी20 मालिका जिंकली, तर टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम करेल. (Photo- ACC)