Shree Charani: एका वर्षात श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच काही सोसलं
भारतीय महिला संघाची डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने पदार्पणाच्या फक्त 14 महिन्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये नंबर 1 गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. श्री चरणीचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत फॉर्म कायम आहे. तिने फक्त तीन सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियाची डावखुरी फिरकी गोलंदाजी श्री चरणीने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे. तिने आयसीसी टी20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. वयाच्या 21 व्या वर्षी श्री चरणीने हा मान मिळवला आहे. (फोटो-GETTY IMAGES)

आयसीसी टी20 क्रमवारीतील गोलंदाजी विभागात श्री चरणीने 23 जून रोजी पहिलं स्थान पटकावलं आहे. तिने इंग्लंडच्या लिंसे स्मिथला मागे टाकलं आहे. श्री चरणी 753 रेटिंग प्वॉइंटसह पहिल्या स्थानावर आहे. तर चार्ली डीन 733 प्वॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. (फोटो-GETTY IMAGES)

श्री चरणीने मागच्या 12 वर्षात भेदक गोलंदाजी करून टी20 क्रिकेटमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. तिने 28 जून 2025 रोजी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल होतं. एका वर्षात तिने पहिलं स्थान पटकावलं आहे. श्री चरणीने भारतासाठी 23 टी20 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. (फोटो-GETTY IMAGES)

श्री चरणी आंध्र प्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यातील आहे. मामाने तिला या क्षेत्रात येण्यासाठी पाठिंबा दिला. इतकंच काय कुटुंबदेखील तिच्या पाठीशी होतं. पण काही नातेवाईक तिला टोमणे मारत होते. क्रिकेट आणि छोटे केस ठेवल्याने नातेवाईक बोलायचे. पण तिने आता सर्वांची बोलती बंद केली आहे. (फोटो-GETTY IMAGES)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत श्री चरणीने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध 3 विकेट घेतल्या. त्यानंतर नेदरलँडविरुद्ध 4 विकेट काढल्या होत्या. तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन विकेट नावावर केल्या होत्या. आतापर्यंत तिने तीन सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. (फोटो-GETTY IMAGES)