IND vs ENG : तिसऱ्या सामन्यातून तिघांचा पत्ता कट! संधी कुणाला मिळणार?

India vs England ODI Probable xi: भारतीय संघाने सलग 2 सामन्यांसह एकदिवसीय मालिका जिंकली. त्यामुळे आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.

| Updated on: Feb 11, 2025 | 1:16 PM
1 / 5
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली आहे. टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा सामना हा 12 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. कॅप्टन रोहित तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल करु शकतो.

2 / 5
तिसऱ्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा केएल राहुल याच्या जागी विकेटकीपर ऋषभ पंत याला संधी देऊ शकतो. केएलला पहिल्या 2 सामन्यात काही खास करता आलं नाही. केएल आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे ऋषभ पंतला संधी मिळू शकते.

3 / 5
चायनामॅन बॉलर कुलदीप यादव याला अंतिम सामन्यासाठी संधी मिळू शकते. कुलदीपला रवींद्र जडेजाच्या जागी संधी मिळू शकते. जडेजाने मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. तर कुलदीपला वरुण चक्रवर्तीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर रहावं लागलं होतं.

4 / 5
अर्शदीप सिंह याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलीय. मात्र अर्शदीपला एकदिवसीय सामन्यांचा फारसा अनुभव नाही. तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमी याने दुखापतीनंतर अनेक महिन्यांनी कमबॅक कलं. त्यामुळे शमीला पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी मिळाली. तर टीम मॅनेजमेंटने हर्षित राणाला संधी दिली आहे. त्यामुळे अर्शदीपला तिसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते.

5 / 5
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा/कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह/मोहम्मद शमी.