आशियात टीम इंडियाचा तोरा! ‘या’ 7 बाबतीत भारतीय महिला संघ ठरला नंबर 1; टक्कर देणारं कोणीच नाही

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला 72 धावांनी पराभवाची धूळ चारली. या स्पर्धेचा भारताचा वरचष्मा पाहायला मिळाला. इतकंच या जेतेपदासह भारतीय संघाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आशियात कोणताच संघ आजूबाजूला दिसेना.

| Updated on: Sep 14, 2026 | 2:28 PM
1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा एकतर्फी पराभव करत नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद आपल्या नावावर केले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीसमोर आशियातील इतर कोणताही संघ टिकू शकला नाही. (फोटो-GETTY IMAGES)

भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा एकतर्फी पराभव करत नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद आपल्या नावावर केले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीसमोर आशियातील इतर कोणताही संघ टिकू शकला नाही. (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5

पूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक 32 षटकार ठोकले. विशेष म्हणजे, आशिया कपमधील इतर सर्व देशांचे संघ मिळूनही केवळ 22 षटकार मारू शकले, यावरून भारताच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज येतो. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5

या संपूर्ण आशिया कप स्पर्धेत केवळ एकच शतक पाहायला मिळाले आणि ते भारतीय उपकर्णधार स्मृती मानधनाच्या बॅटमधून आले. इतर कोणत्याही देशातील खेळाडूला या स्पर्धेत शतकी टप्पा गाठता आला नाही. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5

भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक 4 अर्धशतके झळकावली गेली, तर इतर सर्व संघांना मिळून फक्त 2 अर्धशतके करता आली. फलंदाजीत भारताचा रन रेट 8.35 राहिला, तर इतर संघांचा सरासरी रन रेट अवघा 5.12 इतकाच होता. (फोटो-GETTY IMAGES)

5 / 5

महिलांचा दबदबा राहिला. भारताची सरासरी गोलंदाजी प्रति ओव्हर 8.84 धावा आणि इकॉनॉमी रेट 4.29 राहिला. याउलट, इतर सर्व संघांची सरासरी 16.12 आणि इकॉनॉमी 5.79 अशी महागडी ठरली. (फोटो-GETTY IMAGES)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us