अमेरिकेला मोठा झटका, चीन बनणार बॉस, ब्रिक्स परिषदेत मोठा खेळ, भारतही..
ब्रिक्स परिषदेत चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग सहभागी झाले. यादरम्यान जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यात व्दिपक्षीय बैठक झाली. जिनपिंग यांनी भारतासमोर अत्यंत मोठा प्रस्ताव ठेवला. हा थेट अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे.

चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले होते. तब्बल सात वर्षानंतर ते भारताच्या दाैऱ्यावर होते. त्यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा होत्या. शी.जिनपिंग भारतात ब्रिक्स परिषदेसाठी येणार की नाही, यावरून विविध चर्चा रंगल्या होत्या. गलवान घाटीत झालेल्या संघर्षानंतर पुन्हा भारत आणि चीनचे संबंध रूळावर आली. तब्येत खराब असतानाही शी.जिनपिंग भारत दाैऱ्यावर आलेत. भारत आणि चीनची वाढलेली मैत्री अमेरिकेसाठी डोकेदुखी आहे. त्यातच आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये अमेरिकेच्या कंपन्यांना धक्का देण्याच्या तयारीत चीन आहे. चीनने नवा मोठा डाव खेळला आहे. ब्रिक्स परिषदेत भारतात पोहोचलेल्या जिनपिंग यांनी AI वरून आपले मत मांडत मोठा प्रस्ताव ठेवला. जिनपिंग यांनी BRICS AI ओपन सोर्स कम्युनिटी आणि डिजिटल इकोसिस्टम क्लाउड प्लेटफॉर्म आणण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला.
मुळात म्हणजे चीन हा अमेरिकेला चॅलेज करत आहे. जिनपिंग हे ओपन AI एंथ्रोपिक आणि गूगल सारख्या अमेरिकी क्लोज्ड स्टिस्टम्स यांच्यासमोर डीप सीक आणि क्केन सारख्या चीनी ओपन वेट AI मॉडल्सला पुढे घेऊन जात आहेत. दुसरीकडे चीनला ओपन वेट मॉडल्स डेवलपर्सला डाऊनलोड करायचे आहे. ब्रिक्सच्या नवी दिल्लीतील घोषणा पत्रात हा प्रस्ताव नाही.
2027 मध्ये ब्रिक्सचे आयोजन चीन करणार आहे, त्यावेळी हा प्रस्ताव पुन्हा चीनकडून मांडला जाईल. चीनचा हा मास्टर गेम आहे. भारतासाठी चीनचा हा प्रस्ताव अत्यंत महत्वाचा आहे. भारताची याबाबत स्वतंत्र निती आहे. भारत चीनच्या योजनेत सहभागी होणार की नाही याबाबत स्पष्ट भूमिका पुढे आली नाही. मात्र, हा अमेरिकेसाठी नक्कीच मोठा धक्का असणार आहे.
BRICS मध्ये भारत रिप्लेस नाही करणार. मुळात म्हणजे भारताची याबाबत स्पष्ट भूमिका आहे की, भारत कोणावरही अवलंबून राहणार नाही. IndiaAI मिशनच्या माध्यमातून भारत स्वत: च्या मजबूतीकरणाकरण लक्ष देईल. भारत आणि चीन यांची वाढलेली जवळीकता अनेक देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. शी.जिनपिंग, पुतिन आणि मोदी यांना एकत्र पाहून पाकिस्तानचा थयथयाट बघायला मिळाला.
