Pratika Rawal चं न्यूझीलंड विरुद्ध वादळी शतक, वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Pratika Rawal IND vs NZ Womens : टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या हिशाबाने करो या मरो असलेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात ओपनर प्रतिका रावल हीने इतिहास घडवला. प्रतिकाने शतकी खेळी करत 1 रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच दिग्गज फलंदाजाच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.

Updated on: Oct 23, 2025 | 6:27 PM
1 / 5
आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत यजमान टीम इंडियाला आपल्या पहिल्या 5 सामन्यांमध्ये अपवाद वगळता काही खास करता आलं नाही. त्यामुळे खेळाडूंसह टीमवरही टीका करण्यात आली. टीम इंडियाची ओपनर प्रतिका रावल हीच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.  मात्र प्रतिकाने उपांत्य फेरीच्या दृष्टीने अटीतटीच्या सामन्यात 134 बॉलमध्ये 122 रन्स करत वादळी खेळी केली. प्रतिकाने  न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यातील या खेळीसह खोऱ्याने रेकॉर्ड्स केले आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
प्रतिका रावल हीने स्मृती मंधानासह शतकी सलामी भागीदारी केली.  तसेच प्रतिकाने या दरम्यान मोठा विक्रम आपल्या नावावर केला.  (Photo Credit : PTI)

3 / 5
प्रतिकाने 12 धावा पूर्ण करताच खास कामगिरी केली. प्रतिकाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. प्रतिकाने यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. (Photo Credit : PTI)

4 / 5
प्रतिकाने अवघ्या 23 व्या डावात 1 हजार एकदिवसीय धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली. प्रतिकाने यासह लिंडसे रीलर यांच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. (Photo Credit : PTI)

5 / 5
प्रतिकाने एक विशेष कामगिरी केली. प्रतिकाने एकदिवसीय पदार्पण ते आतापर्यंत एकूण 304 दिवसांच्या आता 1 हजार धावा पूर्ण केल्या. प्रतिकाने यासह लॉरा वूल्वार्टचा 734 दिवसांचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : PTI)