
आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 11 पैकी 5 सामन्यात विजय, तर 6 सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 10 गुणांसह आरसीबीचा संघ सातव्या स्थानावर आहे. अजून तीन सामने उरले असून दमदार कामगिरीच्या जोरावर प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. (Photo : IPL/BCCI)

आरसीबीचे पुढील तीन सामन्याचं गुण धरले तर एकूण 16 गुण होतील. चौथ्या क्रमांकाच्या संघासाठी 16 गुणांची आवश्यकता आहे. पण सध्या टॉप 4 मधील चार संघांनी 16 पेक्षा जास्त गुण मिळवले तर आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात येतील. (Photo : IPL/BCCI)

पण मुंबई, चेन्नई, राजस्थान आणि लखनऊने तीन पैकी दोन सामने गमावले तर मात्र गणित वेगळं असेल. आरसीबीला प्लेऑफमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता असेल. (Photo : IPL/BCCI)

आरसीबीला तिन्ही सामन्यात विजय मिळवायचा आहे. आरसीबीचे तीन पैकी दोन सामने टॉप 4 मधील संघांशी आहेत. त्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. या दोन संघांना पराभूत करत गुणतालिकेत मोठा उलटफेर करण्याची संधी आहे. तर हैदराबाद विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. (Photo : IPL/BCCI)

गुणतालिकेत सध्या सातव्या स्थानावर असलेल्या आरसीबीला पुढील तीन सामने जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.पण इतर संघांचे निकालही आरसीबीच्या प्लेऑफचा मार्ग ठरवतील. (Photo : IPL/BCCI)

सध्याचं गुणतालिकेचं गणित पाहिलं तर कोणता संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल सांगता येत नाही. तळाशी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स सोडलं तर इतर नऊ संघांना जर तरच्या आधारावर संधी आहे. हैदराबादचे 8 गुण असून अजूनही 4 सामने उरले आहेत. (Photo : IPL/BCCI)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले. (Photo : IPL/BCCI)