
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली या जोडीने आयपीएल 16 व्या मोसमात ऐतिहासिक कारनामा केला आहे. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली जोडी आयपीएलच्या हंगामातील एक नंबर जोडी ठरली आहे. या दोघांनी या पर्वातील एकूण 13 सामन्यात ओपनिंग पार्टनरशीपच्या माध्यमातून 872 धावा केल्या आहेत.

या 873 धावांच्या भागीदारीत या जोडीने 3 वेळा शतकी आणि 4 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे. या आधी एका मोसमात सलामी जोडीकडून सर्वाधिक धावांचा विक्रम हा जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर होता. या दोघांनी 10 डावांमध्ये एकूण 791 धावांची भागीदारी केली होती.

विराटने फाफसोबतच्या यशस्वी भागीदारीचं रहस्य उलगडलं आहे. फाफसोबतच्या या भागीदारीसाठी टॅटू कारणीभूत असल्याचं विराट म्हणाला. विराट आणि फाफ एकमेकांना इंक बॉईज म्हणतात.

फाफ आणि एबी डी व्हीलियर्स या दोघांसोबत बॅटिंग करण्याचा अनुभव तसाच आहे. फाफला कधी कसं खेळायचं याचं तंत्र माहिती आहे. त्याला याबाबत समज आहे, असं विराटने म्हटलं.

विराट आणि फाफ या दोघांमध्ये क्रिकेटशिवाय आणखी एक समान आणि आवडीची गोष्ट म्हणजे टॅटू. या दोघांना टॅटूची फार आवड आहे. त्यामुळे या दोघांनी आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी टॅटू काढले आहेत.