
आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा श्रीगणेशा शुक्रवार 22 मार्चपासून होतोय. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु भिडणार आहेत.

यंदाच्या मोसमातील पहिला सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम अर्थात चेपॉक येथे आयोजित करण्यात आला आहे. इथेच पहिल्या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे.

या ओपनिंग सेरेमनीमध्ये कोणते कलाकार परफॉम करणार आहेत, याबाबतची माहिती आयपीएलने दिली आहे. या यादीमध्ये मिस्टर खिलाडी अर्थात अक्षय कुमार आणि दिग्गज सिंगर एआर रहमान यांचा समावेश आहे.

या रंगारंग कार्यक्रमाला संध्याकाळी साडे सहा वाजता सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम लाईव्ह जिओ सिनेमावर पाहता येईल.

रंगारंग कार्यक्रमात अक्षय कुमार, एआर रहमान यांच्याव्यतिरिक्त अभिनेता टायगर श्रॉफ आणि डीजे एक्सवेल हजर राहणार आहेत.

आयपीएलच्या गेल्या हंगामातील ओपनिंग सेरेमनीला अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि रश्मिका मंदाना यांनी परफॉर्म केलं होतं. तसेच अर्जीत सिंह यानेही आपल्या आवाजाने मनं जिंकली होती.