
आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळणाऱ्या खेळाडूचं नाव एरॉन फिंच आहे. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने 9 संघांसाठी खेळला आहे. 2023 स्पर्धेत झालेला हा विक्रम अजूनही कायम आहे. चला जाणून घेऊयात एरॉन फिंचचा स्पर्धेतील प्रवास

एरॉन फिंचने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले. फिंचने पदार्पणाच्या मोसमात फक्त 1 सामना खेळला.

एरॉन फिंच 2011 ते 2012 या कालावधीत दिल्ली डेअयरडेविल्ससाठी खेळला. दिल्लीसाठी त्याने एकूण 8 सामने खेळले.

2013 साली एरॉन फिंचची निवड पुणे वॉरियर्स संघात झाली. यावेळी त्याने एकूण 14 सामने खेळल. दरम्यान त्याने पुणे वॉरियर्सचे कर्णधारपदही भूषविले.

2014 साली एरॉन फिंच सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. यावेळी एरॉन 13 सामन्यात खेळला.

2015 मध्ये एरॉन फिंचला सनरायझर्स हैदराबादने वगळले आणि त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईसाठी फिंचने 3 सामने खेळले.

2016-2017 कालावाधीत एरॉन फिच गुजरात लायन्स संघात दिसला. त्याने संघासाठी एकूण 16 सामने खेळले.

गुजरात लायन्सने 2018 मध्ये रिलीज केल्यानंतकर किंग्स इलेव्हन पंजाबने (आताचे पंजाब किंग्स) फिंचला संधी दिली. त्याने 2018 मध्ये पंजाबसाठी 10 सामने खेळले.

2019 च्या आयपीएलमध्ये सहभागी न झालेल्या एरॉन फिंचने 2020 मध्ये होणाऱ्या लिलावासाठी पुन्हा स्वतःचे नाव जाहीर केले. यावेळी आरसीबीने फिंचला विकत घेतले. फिंच आरसीबीकडून 12 सामने खेळला.

आयपीएल 2021 मध्ये एरॉन फिंचला कोणत्याही फ्रेंचायझीने खरेदी केले नाही. तथापि, फिंचने 2022 मध्ये पर्यायी खेळाडू म्हणून केकेआर संघात प्रवेश केला आणि 5 सामने खेळले.

एरॉन फिंचने आयपीएलमध्ये 9 संघांकडून खेळून एक खास विक्रम केला आहे. आता सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करणारा फिंच समालोचक म्हणून काम करत आहे.