
मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये 11 एप्रिल रोजी आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात आरसीबीचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर एक फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल झाला आहे. ही मिस्ट्री गर्ल बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासारखी दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे.

ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोण नसून श्रद्धा कपूर हीची बहिण असल्याचं नेटकरी म्हणत आहे. या मिस्ट्री गर्लचीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

दरम्यान कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबईने सलग दुसरा विजय मिळवला. मुंबईने आरसीबीवर 7 विकेट्सने मात केली.

आरसीबीने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. तर मुंबईने उत्तरात विजयासाठी मिळालेलं 197 धावांचं आव्हान हे 15.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं.