
आयपीएलच्या 17 व्या मोसमात आता दिवसेंदिवेस चुरस वाढत आहे. काही संघांची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तर काही संघांचं बाहेर होणं निश्चित झालं आहे. अशात 5 दुर्देवी खेळाडू आहेत, ज्यांना अद्याप प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.

विंडिजचा स्टार बॅट्समन कायले मेयर्स लखनऊ सुपर जायंट्सच्या गोटात आहे. मेयर्सला या हंगामात एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. मेयर्सने गेल्या हंगामातील 13 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडचा स्टार ऑलराउंडर ग्लेन फिलिप्स सनरायजर्स हैदराबाद टीममध्ये आहे. ग्लेनला अद्याप संधी मिळालेली नाही.फिलिप्स गेल्या हंगामात हैदराबादकडून 5 सामने खेळला होता.

न्यूझीलंडचा मुख्य स्पिनर मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्समध्ये आहे. मिचेलचा अद्याप प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मिचेलने गेल्या हंगामात 3 सामने खेळले होते.

नवदीप सैनी याला अजून संधीची प्रतिक्षा आहे. सैनी राजस्थान टीममध्ये आहे. सैनीला 2022 आणि 2023 मध्येही फक्त 2-2 सामन्यातच घेतलं होतं.

अफगाणिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन रहमानुल्लाह गुरबाज याने गेल्या हंगामात केकेआरसाठी ओपनिंग केली. मात्र यंदा तो आतापर्यंत उपेक्षितच ठरला आहे.