
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एक खास विक्रम मोडीत काढला आहे. (PHOTO- IPL/BCCI)

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या. या धावांसह आयपीएल इतिहासात 200हून अधिक धावा करण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर झाला आहे. (PHOTO- IPL/BCCI)

आयपीएल इतिहासात यापूर्वी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर होता. त्यांनी 268 सामन्यात आतापर्यंत 33 वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. पण आता हा विक्रम चेन्नई सुपर किंग्सने मोडीत काढला आहे. (PHOTO- IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने 253 सामन्यात 35 वेळा 200 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने दोन वेळा 200 हून अधिक केल्या आणि आरसीबीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (PHOTO- IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला 83 धावांनी पराभूत केलं. यानंतर एका विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा 80 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणारा संघ ठरला आहे. यापूर्वी आरसीबी, मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्स हे संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर होते. मात्र आता आता चेन्नई सुपर किंग्स आठव्यांदा इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवून पुढे गेला आहे. (PHOTO- IPL/BCCI)