IPL 2025 : आरसीबीचं प्लेऑफचं गणित सुटलं तरी जेतेपदाआधी टेन्शन वाढलं, चौकाराचं गणित फसणार

आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. 16 गुणांसह प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्कं केलं आहे. भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे आरसीबीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

| Updated on: May 10, 2025 | 5:08 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धा भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे स्थगित करण्यात आली आहे. या स्थगितीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघापुढे एक नवीन समस्या निर्माण होऊ शकते. कारण जर आयपीएल एका आठवड्यानंतर पुन्हा सुरु झाली तर काही प्रमुख खेळाडू अनुपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

2 / 5
आरसीबी संघाची मदार इंग्लंड खेळाडूंच्या खांद्यावर आहे. यावेळी आरसीबी संघात तीन इंग्लिश खेळाडू आहेत. जर आयपीएल सुरू होण्यास उशीर झाला तर लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि फिल साल्ट हे आगामी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

3 / 5
इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटी मालिका 22 मे पासून सुरू होणार आहे. यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही 29 तारखेपासून सुरू होत आहे. या मालिकांसाठी जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन आणि फिल साल्ट यांची निवड होईल हे निश्चित आहे.

4 / 5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या संघात आरसीबीचा खेळाडू रोमारियो शेफर्ड देखील आहे. याचा अर्थ असा की जर आयपीएल उशिरा सुरू झाली तर रोमारियो शेफर्ड, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि फिल साल्ट हे आरसीबी संघातून बाहेर पडतील हे जवळजवळ निश्चित आहे.

5 / 5
हे चार प्रमुख खेळाडू आरसीबी संघाबाहेर गेल्यास संघात दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, टिम डेव्हिड आणि श्रीलंकेचा नुवान तुषारा हे विदेशी खेळाडू शिल्लक राहतील. आरसीबीला अंतिम सामन्यांसाठी चार बदली खेळाडू यांची निवड करावी लागेल. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)