
सनरायजर्स हैदराबाद युवा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात वादळी खेळी केली. ईशानने 94 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 231 रॅन्सपर्यंत पोहचता आलं. (Photo Credit : IPL/Bcci)

आरसीबी विरुद्ध एसआरएच यांच्यातील या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलंय. ईशानने सामन्यातील पहिल्या डावात खेळताना 94 रन्स केल्या. ईशानने या दरम्यान मैदानात चारही बाजूला फटके मारले. (Photo Credit : IPL/Bcci)

ईशानने 48 बॉलमध्ये 195.83 च्या स्ट्राईक रेटने 94 रन्स केल्या. ईशानने या दरम्यान 5 गगनचुंबी षटकार खेचले. तर 7 चौकार लगावले. (Photo Credit : IPL/Bcci)

ईशानने 94 पैकी 58 रन्स या फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. ईशानला शतक करण्याची संधी होती. मात्र ईशानला शतक करता आलं नाही. ईशान 94 धावांवर नाबाद परतला. (Photo Credit : IPL/Bcci)

दरम्यान ईशान किशन याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 13 सामन्यांमधील 12 डावांमध्ये 36.11 च्या सरासरीने आणि 153.30 या स्ट्राईक रेटने एकूण 325 धावा केल्या आहेत. ईशानने या दरम्यान एकूण 29 चौकार आणि 14 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : IPL/Bcci)