IPL 2026: प्रत्येक चौथ्या बॉलवर सिक्स-फोर फिक्स, कोण आहे तो हार्ड हिटर?

IPL Facts : जगातील सर्वात लोकप्रिय टी 20I लीग स्पर्धा असा लौकीक असलेल्या आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने आपण आयपीएल स्पर्धेत मिडल ओव्हरमध्ये प्रत्येक चौथ्या बॉलवर चौकार ठोकण्यात माहीर असलेल्या फलंदाजाबाबत जाणून घेऊयात.

Sanjay patil | Updated on: Mar 20, 2026 | 10:29 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. फलंदाजांनी मोसमाआधी आपल्या बॅटला धार लावली आहे. फलंदाज जोरदार सराव करत आहेत. या स्पर्धेच्या इतिहासतील सर्वात भारी हिटर फलंदाज कोण आहे? या हार्ड हिटर फलंदाजाच्या नावावर मिडल ओव्हरमधील प्रत्येक चौथ्या बॉलवर चौकार लगावण्याचा विक्रम आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5

आपण बोलतोय टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्याबाबत. सेहवागच्या नावावर मिडल ओव्हरमध्ये प्रत्येक चौथ्या बॉलवर फोर-सिक्स लगावण्याचा विक्रम आहे. सेहवागने 4.02 बॉलवर चौकार लगावला आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5

सेहवागनंतर निकोलस पूरन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पूरनने 4.32 बॉलमध्ये चौकार लगावला आहे. तसेच आंद्रे रसेल याने 4.37 बॉलवर फोर ठोकला आहे. तसेच शेन वॉटसन याने 4.63 बॉलवर चौकार-षटकार लगावण्याची कामगिरी केली आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5

सेहवाग व्यतिरिक्त मिडल ओव्हरमध्ये सर्वात कमी चेंडूत चौकार लगावण्याचा विक्रम हे रजत पाटीदार याच्या नावावर आहे. रजत 5.02 बॉलवर चौकार लगावतो. (Photo Credit : PTI)

5 / 5

टीम इंडियाचा टी 20I कॅप्टन सूर्यकुमार यादव आयपीएल स्पर्धेत 5.25 बॉलवर चौकार किंवा षटकार लगावतो. तर ऋषभ पंत मधल्या षटकांत 5.52 बॉलवर फोर ठोकतो. (Photo Credit : PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us