IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला, पण ऋषभ पंतला बसला दंड; कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा धुव्वा उडवला. या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या मार्गात खोडा घातला गेला आहे. पण असं असताना लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला दंड बसला आहे.

| Updated on: May 16, 2026 | 5:46 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील 59व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला 7 गडी राखून पराभूत केलं. या पर्वात लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफचं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे या विजयाचा फार काही उपयोग नाही. पण बीसीसीआयने लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावला आहे.  (Photo: BCCI/IPL)

2 / 5
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात षटकं निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याने लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावला आहे. पंतला या चुकीसाठी 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. या स्पर्धेत पंतपूर्वी कर्णधारांनी या चुकीसाठी दंड भरला आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे.  (Photo: BCCI/IPL)

3 / 5
ऋषभ पंतने या स्पर्धेत ही चूक पहिल्यांदा केल्याने 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 चे उल्लंघन आहे. यासाठी किमान 12 लाख रुपयांचा दंड आहे. पंतच्या आधी श्रेयस अय्यर, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल आणि पॅट कमिन्स यांना ठोठावला गेला आहे.  (Photo: BCCI/IPL)

4 / 5
लखनौ सुपर जायंट्सचा प्रवास लीग टप्प्यातच संपणार आहे. आता औपचारिक दोन सामने शिल्लक आहेत. जर लखनौने आपल्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये अशीच चूक पुन्हा केली, तर कर्णधार पंतला 24 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. पंतसोबतच संघातील इतर खेळाडूंच्या सामना शुल्कातूनही कपात केली जाईल. (Photo: BCCI/IPL)

5 / 5
लखनौ सुपर जायंट्सने या हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यापैकी चार जिंकले आहेत. तर आठ गमावले आहेत. लखनौचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहेत. पंतच्या कर्णधारपदाखालील लखनौचा हा सलग दुसरा हंगाम आहे, परंतु तो संघाला यश मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. (Photo: BCCI/IPL)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us