IPL 2026 Playoff: आयपीएल स्पर्धेतील चौथ्या स्थानासाठी एक सामना महत्त्वाचा, एकाच वेळी चार संघ होणार आऊट
आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची चुरस आता शेवटच्या टप्प्यात आहे. तीन संघाची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान मिळालं आहे. तर मुंबई आणि लखनौ स्पर्धेतून आऊट झाले आहे. आता पाच संघात एका जागेसाठी चुरस आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत आता प्लेऑफची एकच जागा शिल्लक आहे. या एका जागेसाठी पाच संघ शर्यतीत आहेत. पण 24 मे रोजी होणारा सामना प्लेऑफचा संघ चौथा संघ ठरवणार आहे. त्यामुळे हा सामना एक संघ सोडून चार संघाचं भवितव्य ठरवेल. (Photo: IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेत 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ उभे ठाकतील. राजस्थानने हा सामना जिंकला तर 16 गुण पदरात पडतील. त्यामुळे प्लेऑफच्या आशेवर असलेल्या इतर संघांचा स्पर्धेतून पत्ता कट होईल. (Photo: IPL)

पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर त्याचे प्रत्येकी 15 गुण होतील. तर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे 14 गुण होतील. त्यामुळे 16 गुणांचं गणित सोडवण्यात राजस्थानचा संघ यशस्वी झाला तर या चार संघांना गाशा गुंडाळावा लागेल. (Photo: IPL)

राजस्थान रॉयल्सने 24 मे रोजी मुंबई इंडियन्सला पराभूत करणं गरजेचं आहे. कारण हा सामना त्यांच्यासाठीही करो या मरोची लढाई असेल. जर या सामन्यात पराभव झाला तर पुढचं गणित कठीण होईल. (Photo: IPL)

राजस्थान रॉयल्सने शेवटचा सामना जिंकला, तर प्लेऑफ फेरीत त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यापैकी एकाशी होईल. कारण हे तीन संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. पहिला क्वालिफायर कोण खेळणार? पुढील सामन्यांवरून एलिमिनेटरमध्ये कोण खेळणार हे ठरेल. (Photo: IPL)