IPL 2026, Qualifier 1: आरसीबीने गुजरातच्या या तीन विकेट काढल्या तर अर्धा सामना जिंकला, कसं ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा धर्मशाळेतील एचपीसीए मैदानात होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. आरसीबीकडे तशी संधी असून तीन विकेट काढाव्या लागतील.

| Updated on: May 26, 2026 | 5:12 PM
1 / 6
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स सामन्याने सुरूवात होईल. क्वॉलिफायर 1 सामन्यात हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत धडक मारेल. आरसीबीकडे हा सामना जिंकण्याची संधी आहे. यासाठी आरसीबीला पावरप्लेमध्ये तीन विकेट घ्यावे लागतील.  (Photo: BCCI/IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स सामन्याने सुरूवात होईल. क्वॉलिफायर 1 सामन्यात हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत धडक मारेल. आरसीबीकडे हा सामना जिंकण्याची संधी आहे. यासाठी आरसीबीला पावरप्लेमध्ये तीन विकेट घ्यावे लागतील. (Photo: BCCI/IPL)

2 / 6

गुजरात टायटन्सने तीन विकेट पावरप्लेच्या सहा षटकात मिळाले तर आरसीबीन अर्धा सामना जिंकेल. कारण गुजरात टायटन्सच्या फलंदाजीची धुरा या तीन फलंदाजांवरच आहे. या स्पर्धेत या तीन खेळाडूंची कामगिरी पाहता तसंच म्हणावं लागेल. त्यामुळे या तीन विकेट काढण्याचं आव्हान आरसीबीच्या गोलंदाजांसमोर असेल. (Photo: BCCI/IPL)

3 / 6

गुजरात टायटन्सचा सलामीवर साई सुदर्शन या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने 14 सामन्यातील 14 डावात 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 638 धावा केल्या ठआहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 157.92 चा आहे. या खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. (Photo: BCCI/IPL)

4 / 6

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 13 सामन्यातील 13 डावात 616 धावा केल्या आहेत. त्याने 6 अर्धशतकं ठोकली आहेत. तर 86 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. (Photo: BCCI/IPL)

5 / 6

जोस बटलर गुजरात टायटन्सचा तिसरा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेच्या 14 डावात 469 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतकं ठोकली आहेत. 60 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. सध्या फलंदाजीच्या यादीत 14व्या स्थानावर आहे. पण काही संघांना आपल्या खेळीने अडचणीत आणलं आहे. (Photo: BCCI/IPL)

6 / 6

गुजरात टायटन्ससाठी या तिघांव्यतिरिक्त कोणीही 350पेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या फलंदाजीची धुरा या तीन खेळाडूंवरच आहे. या तीन खेळाडूंना बाद केलं तर आरसीबी या सामन्यावर पकड मिळवू शकते. (Photo: BCCI/IPL)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us