
गतविजेता आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शनिवारी 28 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात विजयी सलामी दिली. आरसीबीने सनरायजर्स हैदराबादवर 6 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने घरच्या मैदानात अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये या विजयासह 16 वर्षांची प्रतिक्षा संपवली. (Photo Credit : PTI)

आरसीबीने सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेलं 202 धावांचं आव्हान सहजपणे पूर्ण केलं. आरसीबीची एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही दुसरी वेळ ठरली. आरसीबीने याआधी 2010 साली पंजाब विरुद्ध पहिल्यांदा असा कारनामा केला होता. (Photo Credit : PTI)

तसेच आरसीबी स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारी टीम ठरली. आरसीबीने 15.4 ओव्हरमध्ये 202 धावांचं आव्हान पूर्ण केलं. आरसीबीआधी राजस्थान रॉयल्सने 2025 साली गुजरात विरुद्ध 15.5 ओव्हरमध्ये अशी कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)

विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल हे दोघे आरसीबीच्या या विजयाचे हिरो ठरले. आरसीबीसाठी विराट कोहली याने सर्वाधिक आणि नाबाद 69 धावा केल्या. तर देवदत्तने 61 धावांचं योगदान दिलं. (Photo Credit : PTI)

तसेच आरसीबीच्या जेकब डफी याने आयपीएल पदार्पणात धमाका केला. जेकबने आरसीबासाठी हैदराबादच्या 3 फलंदाजांना आऊट केलं. जेकबने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit : PTI)