RR vs GT : आयपीएल स्पर्धेत जोफ्रा आर्चरच्या नावावर नकोसा विक्रम, पहिल्या षटकात राजस्थानला आणलं गोत्यात
आयपीएल 2026 स्पर्धेतील 52व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने नकोसा विक्रम रचला आहे. पहिल्याच षटकात संघाला गोत्यात आणलं. त्यामुळे सामन्यावर पकड मिळवण्यात गुजरात टायटन्सला यश आलं.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 52व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रियान परागला दुखापत झाल्याने कर्णधारपदाची धुरा यशस्वी जयस्वालच्या खांद्यावर आहे. राजस्थानचा कर्णधार यशस्वी जयस्वालने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरकडे पहिले षटक सोपवले. (Photo: IPL/BCCI)

जोफ्रा आर्चरचे टाकलेलं षटक आयपीएलच्या स्पर्धेच्या इतिहासात नकोसं म्हणून नोंदवलं गेलं आहे. कारण त्याने सहा वैध चेंडू टाकण्यासाठी दहापेक्षा जास्त चेंडू घेतले. जोफ्रा आर्चरला डावाच्या पहिल्या षटकात सहा वैध चेंडू टाकण्यासाठी एकूण 11 चेंडू टाकावे लागले. (Photo: IPL/BCCI)

वाईड, नो-बॉल टाकल्यामुळे षटक खूपच लांबले. आपल्या वेगासाठी आणि अचूक टप्पा व दिशा यासाठी ओळखला जाणारा आर्चर या सामन्यात आपला लय साधण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. त्याच्या भरकटलेल्या गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला फटका बसला. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल सामन्याच्या पहिल्या षटकात 11 चेंडू टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सहा गोलंदाजांनी आयपीएलच्या एका षटकात 11 चेंडू टाकले आहेत,. पण डावाच्या पहिल्या षटकात असं कधीच घडलं नव्हतं. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. (Photo: IPL/BCCI)

जोफ्रा आर्चरने पॉवरप्लेमध्ये एकूण दोन षटके टाकली आणि 16.50 च्या इकॉनॉमी रेटने 33 धावा दिल्या. यामुळे गुजरातला पहिल्या सहा षटकांत एकही गडी न गमावता 82 धावा करता आल्या. (Photo: IPL/BCCI)