IPL 2026: आरसीबीविरुद्ध श्रेयस अय्यरची पोलखोल! सलग पाचव्यांदा झालं असं
Shreyas Iyer vs RCB: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या फलंदाजीला ग्रहण लागलं आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धही बॅट शांत राहिली आहे. पण आरसीबीविरुद्ध पाचव्या सामन्यात फेल गेला. काय आहे आकडेवारी ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त सुरूवात केलेल्या पंजाब किंग्सची स्थिती आता नाजूक आहे. टीमचा विजयाचा ग्राफ सरळ खाली आला आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं देखील कठीण झालं आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरची बॅटही चालत नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धही फ्लॉप ठरला. (PHOTO CREDIT- PTI)

आयपीएल स्पर्धेच्या 61व्या आणि संघाचा 13वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार 3 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. आयपीएल 2026 स्पर्धेच्या मागच्या सहा डावात श्रेयस अय्यर 20 धावांचा आकडाही गाठू शकलेला नाही. (PHOTO CREDIT- PTI)

श्रेयस अय्यर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध काही खास करू शकलेला नाही. मागच्या काही सामन्यातील आकडेवारी तसंच सांगत आहे. या संघाविरुद्ध सलग पाचव्यांदा एकेरी धाव करून बाद झाला आहे. त्याने मागच्या चार डावत 1, 2, 6 आणि 7 धावा केल्या होत्या. (PHOTO CREDIT- PTI)

श्रेयस अय्यर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध करिअरच्या सुरूवातीला पहिल्या 14 डावात फक्त तीन वेळा एकेरी धावांवर बाद झाला होता. मात्र मागच्या पाच डावात एकेरी धावांवर बाद होत नकोशी आकडेवारी नावावर केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

श्रेयस अय्यरने आयपीएलच्या 13 सामन्यातील 12 डावात एकूण 397 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 162.70 चा आहे. (PHOTO CREDIT- PTI)