IPL 2026 : आयपीएल स्पर्धेतील दहा संघाच्या सलामीच्या जोड्यांबाबत जाणून घ्या, MI कडून रोहित शर्मा आणि…

आयपीएल 2026 स्पर्धेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या सामन्यापासून सुरूवात होणार आहे. असं असतानाया सामन्यात सलामीला कोण येणार याची उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात दहा फ्रेंचायझींबाबत...

| Updated on: Mar 28, 2026 | 6:06 PM
1 / 11
आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार आहे. असं असताना संघाच्या डावाची सुरूवात कोण करणार? याबाबत चर्चा सुरू आहे. चला जाणून घेऊयात दहा फ्रेंचायझी आणि त्यांच्या सलामीच्या जोड्या

आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार आहे. असं असताना संघाच्या डावाची सुरूवात कोण करणार? याबाबत चर्चा सुरू आहे. चला जाणून घेऊयात दहा फ्रेंचायझी आणि त्यांच्या सलामीच्या जोड्या

2 / 11

मुंबई इंडियन्सकडून सलामीला रोहित शर्मा उतरणार हे निश्चित आहे. त्याला साथ देणार दक्षिण अफ्रिकेचा डावखुरा फलंदाज क्विंटन डीकॉक..

3 / 11

गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन सुरूवात करतील. ही जोडी मागच्या काही पर्वात हिट ठरली आहे. त्यामुळे ही जोडी बदलण्याची शक्यता कमीच आहे.

4 / 11

सनरायझर्स हैदराबाद आपल्या सलामीच्या जोडीला काही हात लावणार नाही. मागच्या पर्वाप्रमाणे यंदाही ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच ओपनिंग करेल.

5 / 11

दिल्ली कॅपिटल्सचं सलामीचं गणित या हंगामात विस्कळीत झालं. बेन डकेट्सने नकार दिल्याने ऐनवेळी सलामीची जोडी बदलावी लागणार आहे. केएल राहुलसोबत सलामीला श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज पाथुम निस्संका उतरेल.

6 / 11

चेन्नई सुपर किंग्स संघाने यंदा कात टाकली आहे. संजू सॅमसन संघात आल्याने ताकद वाढली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला संजू सॅमसन उतरेल, यात काही शंका नाही.

7 / 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून गतवर्षीप्रमाणे यंदाही विराट कोहली आणि फिल सॉल्ट सुरूवात करतील. या जोडीने मागच्या पर्वात कमाल केली होती. त्यामुळे ही जोडी तशीच ठेवतील.

8 / 11

कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी मागच्या पर्वात निराशाजनक झाली होती. यावेळी सलामीला एक बदल केला जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडचा फिन एलन डावाची सुरूवात करेल. तर त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकला अजिंक्य रहाणे असेल.

9 / 11

राजस्थान रॉयल्स संघात यंदा बदल झाले आहेत. संजू सॅमसन नसल्याने ओपनिंग कोण करणार याची उत्सुकता आहे. सलामी डावखुरे फलंदाज करणार असल्याच दिसत आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरेल.

10 / 11

लखनौ सुपर जायंट्सकडून मागच्या पर्वात मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी सुरूवात केली होती. त्यामुळे यंदाही याच जोडीला पसंती दिली जाईल.

11 / 11

पंजाब किंग्सकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग ही जोडी उतरणार असं स्पष्ट दिसत आहे. मागच्या पर्वात या जोडीने कमाल केली होती. यावेळी त्यांच्यावर विश्वास टाकला जाईल. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us