Vaibhav Sooryavanshi नॉनस्टाप, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, आता काय केलं?

Most sixes: वैभव सूर्यवंशी याने कमी वयात भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करत अनेक विक्रम केले आहेत. वैभवने आयपीएलच्या 19 व्या मोसमादरम्यान एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. जाणून घ्या.

Sanjay patil | Updated on: Apr 05, 2026 | 6:18 PM
1 / 5
अंडर 19 टीम इंडियाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने गेल्या वर्षभरात असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वैभवने कमी वयात असंख्य वर्ल्ड रेकॉर्डही मोडीत काढले आहेत. वैभव अवघ्या काही दिवसांपू्र्वी 15 वर्षांचा झाला. त्यानंतर वैभवने एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. वैभवने वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या विश्व विक्रमाची बरोबरी केली आहे.  (Photo Credit: PTI)

2 / 5

अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरुबाज याच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये 18 वर्षापर्यंत सर्वाधिक 68 सिक्स लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5

वैभव सूर्यवंशी याने वयाच्या 15 वर्ष आणि 8 व्या दिवशीच रहमानुल्लाहच्या या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. त्यामुळे आता वैभव हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याच्या उंबरठ्यावर आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5

वैभवने आतापर्यंत टी 20 कारकीर्दीत एकूण 68 षटकार लगावले आहेत. वैभवने या 68 पैकी 30 षटकार हे आयपीएल स्पर्धेत ठोकले आहेत. त्यामुळे आता 1 सिक्स लगावताच वैभव 18 वर्षांपर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरेल. (Photo Credit: PTI)

5 / 5

दरम्यान वैभव सूर्यवंशी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करत आहे. वैभव राजस्थानसाठी ओपनिंग करतो. वैभवने आतापर्यंत राजस्थानसाठी 9 सामन्यांमध्ये 335 धावा केल्या आहेत. वैभवने या दरम्यान 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us