Ishan Kishan: इशान किशनच्या नावावर मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय विकेटकीपर
आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इशान किशनच्या कर्णधारपदाचा कस लागला. या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. इशानने 80 धावांची खेळी केली, पण व्यर्थ गेली. असं असताना त्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशनची बॅट चांगलीच तळपली. त्याने फक्त 38 चेंडूत 80 धावा केल्या. पण इतकी चांगली खेळी करूनही हैदराबादचा पराभव झाला. गोलंदाजीत हैदराबादचा संघ एकदम सुमार राहिला. असं असताना इशान किशनच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. (Photo- PTI)

इशान किशनने आरसीबीविरुद्ध 80 धावांची खेळी करत आयपीएलमध्ये 3 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. त्याने 120 सामन्यातील 113 डावात 3078 धावा केल्या. आयपीएलमध्ये कमी चेंडूत 3 हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय आणि चौथा विकेटकीपर ठरला आहे. (Photo- PTI)

इशान किशनने 2180 चेंडूत 3000 धावा पूर्ण केल्या आहे. यासह त्याने केएल राहुलला सातव्या क्रमांकावर ढकललं आहे. त्याने 2203 चेंडूत 3000 आयपीएल धावा केल्या होत्या. (Photo- PTI)

ऋषभ पंत या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2028 चेंडूत 3000 धावा पूर्ण केल्या. युसूफ पठाणने 2082 चेंडूत, सूर्यकुमारने 2130 चेंडूत, सुरेश रैनाने 2135 चेंडूत आणि धोनीने 2151 चेंडूत 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo- PTI)

इशान किशन कमी चेंडूत 3000 धावा करणाऱ्या विकेटकीपर फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. यापूर्वी ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी आणि केएल राहुल होते. आता चौथा विकेटकीपर फलंदाज म्हणून इशान किशनची नोंद झाली आहे. (Photo- PTI)