ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहने ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू ठरला
ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचा डाव पहिल्याच दिवशी विस्कटला आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. भारताला 180 धावांपर्यंत मजल मारता आली. तर ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थिती आहे. असं असताना या सामन्यात जसप्रीत बुमराहने अर्धशतकी कामगिरी केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. डे नाईट कसोटीत भारतीय संघाची पहिल्या दिवशी पुरती वाट लागली. भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 180 धावांवर तंबूत परतला. या सामन्यात जसप्रीत बुमराह शून्यावर बाद झाला. पण एका अर्धशतकाची नोंद केली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि नाथन मॅकस्वीने ही जोडी मैदानात उतरली होती. तर भारताकडून गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होती.सातव्या षटकात जसप्रीत बुमराह अर्धशतक करण्याची संधी चालून आली होती. पण रोहित शर्मा आणि ऋषभ पंतमुळे ही संधी हुकली.

जसप्रीत बुमराह हार पत्कारण्यातला नाही, हे सर्वश्रूत आहे. 11 व्या षटकात त्याने अर्धशतक ठोकून दाखवलं. उस्मान ख्वाजाची विकेट घेत त्याने अर्धशतक साजरं केलं. अशी कामगिरी करणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.


जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5, तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नावावर एक विकेट आली आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.