AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात; आंदोलक थेट रस्त्यावर उतरले, काय आहे संपूर्ण प्रकरण?

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाचा मार्ग बदलण्यावरून आंदोलन पेटलं आहे.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात; आंदोलक थेट रस्त्यावर उतरले, काय आहे संपूर्ण प्रकरण?
| Updated on: Aug 09, 2026 | 10:44 AM
Share

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग वादात सापडला आहे. या रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्गात बदल केल्याने अहिल्यानगरकरांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाला नारा पुकारण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखानुसार करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले.

नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून आंमदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक-पुणे मार्गावरील आंदोलनामुळे वाहतूक कोडींच्या त्रासाला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. तर नाशिक-पुणे रेल्वेसाठी सिन्नर-संगमनेर चाकणमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं. या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. एकाच हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे. या आंदोलकांचा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

केंद्र सरकार नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे नारायणगावाचा जागतिक दर्जाचा कमी फ्रिक्वेन्सी रेडिओ दुर्बिह समूह धोक्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे रेल्वे प्रकल्पाचा विरोध केला जात आहे. या विरोधामुळे या मार्गात बदल किंवा भूमिगत मार्गाची आखणी तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? याचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासासाठी अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचसोबत समितीत रेल्वे बोर्डाचे विवेक गुप्ता, पुणे, नाशिक विभागाचे आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार असल्याची माहिती हाती आली आहे.

पुणे-नाशिक हायस्पीडचा मार्ग कसा बदलला?

या हायस्पीड रेल्वेचा पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात नाराजी आहे. नागरिकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा, अहिल्यानगर-चाकण या पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केलंय. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

या प्रकल्पाच्या मार्गाला विरोध म्हणून हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनात सत्यजीत तांबे आणि राजाभाऊ वाजे देखील उतरले आहेत. या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी आंदोलकांना समृद्धी मार्गावर जाण्यापासून रोखलं. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा