AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझे हात-पाय थरथर कापत आहेत..; प्रदीप रावत यांच्या प्रार्थनासभेत मुलगा भावूक

Pradeep Rawat: अभिनेते प्रदीप रावत यांच्या निधनानंतर शुक्रवारी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या मुलाला अश्रू अनावर झाले. प्रदीप रावत यांचं कॅन्सरने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

माझे हात-पाय थरथर कापत आहेत..; प्रदीप रावत यांच्या प्रार्थनासभेत मुलगा भावूक
प्रदीप रावत आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्यImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2026 | 10:40 AM
Share

‘गजिनी’, ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते प्रदीप रावत यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. ते कर्करोगाने ग्रस्त होते. शुक्रवारी मुंबईत त्यांच्या कुटुंबीयांनी प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. प्रार्थना सभेत बोलताना प्रदीप यांचा मुलगा विक्रमादित्य रावत अत्यंत भावूक झाला. “खरंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. बाबांच्या खूप आठवणी आहेत. माझे हात-पाय थरथर कापत आहेत”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला. प्रदीप यांना चार वर्षांपूर्वी कर्करोग झाला होता. त्यातून ते बरे झाले होते. मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

“मी माझ्या वडिलांबद्दल जितकं बोलू शकेन, ते कमीच आहे. ते त्यांचं आयुष्य अत्यंत सन्मानाने जगले. मी देवाकडे नेहमी हीच प्रार्थना करेन किंवा देवाने जरी मला विचारलं की तुला कसे वडील हवे होते, तर मी कायम त्यांचंच नाव घेईन. मी वडिलांसमोर नेहमीच एक इच्छा व्यक्त केली होती. जर ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली तर उत्तम होईल. मी बाबांना म्हणायचो की, मला सलमान सरांशी भेटायचं आहे, कारण मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. फक्त अभिनेते म्हणून नाही तर एक माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत. माझे बाबा त्यांच्याविषयी मला बरेच किस्से सांगायचे. सलमान सरांनी वडिलांसाठी पोस्टसुद्धा लिहिली होती”, असं तो पुढे म्हणाला.

प्रार्थना सभेतील व्हिडीओ

प्रदीप रावत यांना दीड महिन्यापूर्वी सतत उचक्या लागत होत्या. त्यानंतर जेव्हा काही तपासण्या केल्या, तेव्हा रक्ताचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. याविषयी त्यांचा मुलगा एका मुलाखतीत म्हणालेला, “रोज उचकी लागत असताना तो कॅन्सर असू शकतो, असा विचार तरी कोणी कसा करू शकेल? आम्ही त्यांना औषधं दिली, पण हळूहळू त्यांची प्रकृती आणखी बिघडत गेली. आम्ही घरी डॉक्टरला बोलावलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबांना पोटाचा संसर्ग झाला असावा. त्यांना औधषं दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.”

प्रदीप रावत हे 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विक्रमादित्य रावत असा परिवार आहे. प्रदीप यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सरफरोश’, ‘अग्निपथ’ आणि ‘लगान’मधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या.

Follow Us
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल