
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. कारण या सामन्यातील निकालावर मालिकेचं भवितव्य अवलंबून आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. (फोटो- बीसीसीआय)

चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहकडे इशांत शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने दोन कसोटी सामन्यात 12 गडी बाद केले आहेत. त्याच्या नावावर 49 विकेट झाल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय)

इंग्लंडच्या भूमीवर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या इशांत शर्माच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडच्या भूमीवर एकूण 51 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत जसप्रीत बुमराहचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो- बीसीसीआय)

जसप्रीत बुमराहने 49 विकेट्स घेतल्या आहेत. आता जर बुमराहने चौथ्या कसोटीत आणखी तीन विकेट्स घेतल्या तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळेल. (फोटो- बीसीसीआय)

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये असेल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने बुमराह खेळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळताना दिसेल. (फोटो- बीसीसीआय)