टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहसोबत पहिल्यांदाच नको ते घडलं, एका षटकात…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामन्यात जसप्रीत बुमराहसोबत नको ते घडलं. यापूर्वी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहसोबत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांचं मन दुखावलं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 11, 2025 | 8:52 PM
1 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात4  गडी गमवून 213 धावा केल्या. यासह विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात जसप्रीत बुमराहसोबत नको ते घडलं. (Photo-PTI)

2 / 5
जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. आतापर्यंतचा त्याचा रेकॉर्ड तसाच राहिला आहे. पण त्याच्या कारकि‍र्दीत या सामन्यात नकोसा अध्याय लिहिला गेला आहे. न्यू चंदीगडमध्ये एकाच षटकात दोन षटकार पडले. (Photo-PTI)

3 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहच्या एका षटकात दोन षटकार पडल्याची पहिलीच वेळ आहे. जसप्रीत बुमराह वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आला होता. त्या षटकात दोन षटकार पडले. या षटकात त्याने एकूण  16 धावा दिल्या. (Photo-PTI)

4 / 5
दुसऱ्या षटकातील पहिला षटकार तिसऱ्या चेंडूवर आला. रिझा हेनड्रिक्सने हा षटकार मारला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर क्विंटन डीकॉकने षटकार मारला. जसप्रीत बुमराहच्या दोन चेंडूवर दोन षटकार आले ते दोन्ही चेंडू आखुड टप्प्याचे होते. (Photo-PTI)

5 / 5
शेवटच्या षटकातही बुमराहला एका षटकात दोन षटकार पडले. त्यामुळे त्याच्यासाठी या सामन्यातील स्पेल काही चांगला गेला नाही. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 45 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही.  (Photo-PTI)