IPL 2025 स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात आरसीबीला बसणार मोठा धक्का! जेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगणार?

IPL 2025 : आयपीएल 2025 स्पर्धा भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे स्थगित करण्यात आली होती. असं असताना याचं सर्वाधिक दु:ख हे आरसीबी फ्रेंचायझीच्या चाहत्यांना झालं. कारण आरसीबीची या स्पर्धेतील विजयाची लय यामुळे तुटली असं त्यांचं म्हणणं आहे. असं असताना आयपीएल स्पर्धा शुक्रवारपासून सुरु होईल अशी चर्चा आहे. पण त्याआधीच आरसीबी संघाला धक्का बसला आहे.

| Updated on: May 12, 2025 | 5:21 PM
1 / 5
 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित सामन्यांसाठी अनुपलब्ध असण्याची शक्यता आहे. खांद्याच्या दुखपतीमुळे त्रस्त असलेले हेझलवूड चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. आता उर्वरित सामन्यांमध्ये दिसेल की नाही याबद्दल शंका आहे.

2 / 5
जोश हेझलवूड हा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या भीतीने मायदेशी परतलेल्या विदेशी खेळाडूंपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचलेला हेझलवूड खांद्याच्या दुखापतीमुळे परतणे कठीण आहे. जर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज परतला नाही तर आरसीबी संघाला धक्का बसेल.

3 / 5
आरसीबीकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मिळाला आहे. 10 सामन्यांमध्ये 36.5  षटके टाकणाऱ्या हेझलवूडने 8.44  च्या सरासरीने 311 धावा देत 18 विकेट्स घेतल्या आहेत. जोश हेझलवूड वगळता आरसीबीच्या इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने 10 विकेटही घेतलेल्या नाहीत.

4 / 5
जोश हेझलवूड हा यावर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीसाठी सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज आहे. त्याने 36.5 षटकांत एकूण 103 डॉट बॉल टाकले आहेत. हेझलवूड वगळता कोणत्याही आरसीबी गोलंदाजाने 100 डॉट बॉल टाकलेले नाहीत.

5 / 5
जोश हेझलवूडचा फॉर्म पाहता आरसीबी संघाचा कणा आहे. आरसीबी संघ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पुढील तीन सामन्यांमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुला पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. जोश हेझलवूडने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये परतला नाही तर आरसीबीला मोठा धक्का बसेल यात शंका नाही. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)