केएल राहुलचा मोठा विक्रम अवघ्या 11 धावांनी हुकला, पण केली अशी नोंद

अँडरसन-तेंडुलकर मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलने अनेक विक्रम रचले आहेत. या विक्रमांसह 532 धावा करणाऱ्या केएल राहुलने आता चेंडूंचा सामना करण्याच्या बाबतीत टॉप 3मध्ये प्रवेश केला आहे.

| Updated on: Aug 03, 2025 | 10:15 PM
1 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात विदेशात एका मालिकेत टीम इंडियासाठी फक्त तीन सलामीवीरांनी हजाराहून अधिक चेंडूंचा सामना केला आहे. ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज सुनील गावस्कर, दुसरा मुरली विजय आणि तिसरा केएल राहुल आहे. (Photo- BCCI)

2 / 5
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 10डाव खेळणाऱ्या केएल राहुलने एकूण 1066 चेंडूंचा सामना केला आहे. गेल्या 11 वर्षांत टीम इंडियाचा कोणताही सलामीवीर विदेशी कसोटी मालिकेत 1000 चेंडूंचा सामना करू शकलेला नाही. (Photo- BCCI)

3 / 5
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करणाऱ्या केएल राहुलने 1066 चेंडूंचा सामना केला आहे. त्याने बॅटने 532 धावा काढल्या आहेत. 532 धावांपैकी 69  चौकार मारले आहेत. त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. (Photo- BCCI)

4 / 5
भारतीय सलामीवीराने 532 धावांसह दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर सुनील गावस्कर असून 1979 मध्ये इंग्लंडविरुद्ध 542 धावा करून हा विक्रम रचला होता. (Photo- BCCI)

5 / 5
केएल राहुल आता सुनील गावस्कर (1199 चेंडू) आणि मुरली विजय (1054) यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. 532 धावांसह चार दशकांत इंग्लंडमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय सलामीवीरही ठरला आहे. (Photo- BCCI)