सचिन, धोनी आणि कोहलीला जे जमलं नाही ते केएल राहुल करणार, श्रीलंका कसोटी मालिकेत हा विक्रम रचणार

भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत केएल राहुल एका विक्रमाच्या जवळ आहे. एकही चेंडू न टाकता अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे.

| Updated on: Jul 31, 2026 | 10:22 PM
1 / 5
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून 15 ऑगस्टला पहिला सामना आहे. ही कसोटी   मालिका भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलसाठी खूप खास असणार आहे. (Photo: PTI)

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून 15 ऑगस्टला पहिला सामना आहे. ही कसोटी मालिका भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलसाठी खूप खास असणार आहे. (Photo: PTI)

2 / 5

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत एक अनोखा विक्रम करण्याची संधी आहे.केल राहुल एक असा विक्रम रचणार आहे, जो आतापर्यंत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणत्याही खेळाडूने केलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी केएल राहुलला फक्त 170 धावांची गरज आहे. (Photo: PTI)

3 / 5

केएल राहुलने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण 9830 धावा केल्या आहेत. जर त्याने श्रीलंका दौऱ्यात 170 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या एलिट यादीत सामील होईल. विशेष म्हणजे केएल राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. (Photo: PTI)

4 / 5

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही षटके टाकली आहेत. पण केएल राहुलने संपूर्ण कारकिर्दीत कधीही गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी न करता भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर नोंदवला जाईल. (Photo: PTI)

5 / 5

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही षटक किंवा चेंडू न टाकता सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत राहुल सध्या अव्वल स्थानी आहे. अजिंक्य रहाणे 8414 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऋषभ पंत 5637 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us