
मँचेस्टरध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यावर इंग्लंडची पकड दिसत आहे. पहिल्या डावात 311 धावांची मजबूत आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना भारताचे दोन खेळाडू शून्यावर बाद झाले. त्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांनी मोर्चा सांभाळला. (Photo- BCCI Twitter)

भारतीय सलामीवीर केएल राहुलसाठी फॉर्मात आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मँचेस्टर कसोटीत त्याने अर्धशतक पूर्ण केलं आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo- BCCI Twitter)

केएल राहुलने इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना सलामीवीर म्हणून 1000 धावा पूर्ण केल्या. इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा करणारा दुसरा आशियाई सलामीवीर आहे. याआधी फक्त सुनील गावस्कर यांनी हा विक्रम केला होता. (Photo- BCCI Twitter)

इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत केएल राहुलने फक्त 24 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. गावस्कर यांनी 28 डावांमध्ये 1152 धावा केल्या होत्या. या दोघांव्यतिरिक्त, कोणताही आशियाई सलामीवीर इंग्लंडमध्ये हा पराक्रम करू शकले नाहीच.(Photo- BCCI Twitter)

सलामीवीर म्हणून खेळताना केएल राहुलने प्रत्येक सामन्यात धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात त्याने 42 धावा आणि 137 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने 2 धावा आणि 55 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत त्याने 100 धावा आणि 39 धावांची खेळी केली. (Photo- BCCI Twitter)